Saturday, May 18, 2024
Homeवृत्तांत१० डिसेंबर २०१८ सभा वृत्त - शोभनाताई

१० डिसेंबर २०१८ सभा वृत्त – शोभनाताई

सोमवार दि.१० डिसेंबरला ज्येष्ठ समुपदेशक अनुराधा करकरे यांचे व्याख्यान झाले. ‘ पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी ‘ असा विषय होता.सभेस ५०/६० जण उपस्थित होते. प्रार्थनेनंतर शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले. शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि अनुराधा करकरे यांच्या व्याख्यानास सुरुवात झाली. त्यांनी विविध कथांच्या आणि  Activity च्या आधारे पार्किन्सन्सला स्वीकारून आनंदी कसे राहता येईल हे सांगितले. सुरुवातीला Victor  Frankl या नाझी कॅम्पमध्ये छळ सोसलेल्या लोगोथेरपीच्या जनकाची कथा सांगितली. व्हिक्टर छळछावणीतील अनुभव लिहून ते कागद बुटात ठेवी. हे अनुभव त्याला जगापुढे आणता  येणार होते. तो पकडला गेला. हे कागद जाळून टाकण्यात आले. त्याच्या जगण्याला उद्दिष्ट राहिले नाही. व्हिक्टरपुढे आत्महत्या आणि फ्रीडम ऑफ चॉइस असे दोन पर्याय होते. पहिला त्यांनी बाजूला सारला आणि दुसरा स्वीकारला आणि जगभर गाजलेली सायको थेरपी निर्माण झाली. शुभार्थीसाठी सुद्धा पार्किन्सन्स झाला ते  हातात नाही  पण जी विविध शारीरिक, मानसिक लक्षणे आहेत त्यावर मात करणे त्यांच्या  हातात आहे.

यानंतर त्यांनी डोळे मिटून डाव्या हाताने लिहिण्यासाठी एक वाक्य सांगितले. उजव्या हाताइतके चांगले नसले तरी सर्वांना ते जमले. वेगळे काही करायचे तर पहिला नकार असतो. ही सवयीची चौकट मोडायला हवी. प्रतीकुलतेतून नव्याने उमेद घेऊन अनुकुलता शोधायला हवी. व्हिक्टरवरच्याच ‘प्रिझनर्स ऑफ आवर थॉट’ या पुस्तकातून सवयीचे गुलाम न होता प्रत्येक कृती अर्थपूर्ण कशी होईल हे पाहायला हवे. आलेल्या आपत्तीकडे  संधी म्हणून पाहून वेगळ्या पद्धतीने जगायला शिकायला हवे

वरील संदेश पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींना  मिळाला आहे. परंतु माझ्याच बाबतीत असे का? हे असे कसे झाले? या प्रश्नात आपण अडकतो. यातून बाहेर पडण्यासाठी Ash Orther या विम्बल्डन खेळाडूची गोष्ट करकरे यांनी सांगितली. अपघातानंतर दिलेल्या रक्तामुळे तो एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला. यावेळी मलाच का असा विचार न करता ज्यावेळी मला अनेक विजय मिळाले तेंव्हा मी मलाच का असे नाही म्हटले असा विचार केला, वास्तव स्वीकारले.

स्वीकाराला अट नसते.विधान असते. मला अमुक अमुक झाले आहे हे विधान आणि लगेच पूर्णविराम. हा पूर्णविराम जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर आपल्यासाठीचे आयुष्य लवकर जगू शकतो. आपल्यात निरपेक्षता येईल भावनांचे रंग मिसळणार नाहीत. घटना आहे तशी दिसेल.आजाराचा स्वीकार आपोआप होईल.

याचबरोबर भावनांचे संतुलनही हवे. भावनाचा अतिरेक आपल्याला मारतो तर त्या प्रमाणात आल्या तर तारतात मग कोणत्याही प्रसंगात व्यक्ती डगमगत नाही, स्थितप्रज्ञ बनते.

  • भावना ताब्यात ठेवता यायला हव्यात त्यांचा उद्रेकही नको आणि त्या दाबुनही ठेवू नयेत. भावनांचा समतोल हवा. प्रसंग योग्य तऱ्हेने  हाताळण्यास तो उपयोगी पडतो.
  • भावनांची तीव्रता, कालावधी आणि वारंवारिता यावरून भावनांचा समतोल साधता आला आहे का हे समजते.
  • भावनांचा उद्रेक काहीही न करायला प्रवृत्त करतो आणि दमन नैराश्याकडे नेते.

प्रत्येक प्रसंगात विविध पर्याय असतात. भावनांचा उद्रेग झाला की पर्याय दिसत नाहीत. स्वमदत गट हा पार्किन्सन्सला तोंड देण्यासाठी चांगला पर्याय आहे.

भावना निर्माण होते ती धारणा मधून. विविध अनुभव, आईवडिलांची शिकवण, संस्कृती, धर्म, आपण स्वत: अशा विविध बाबीतून धारणा तयार होतात आणि आपल्या हार्ड डिस्क मध्ये पक्क्या बसतात. त्या न तपासता आपण त्याबाबतीत ताठर राहिलो तर उत्तरे सापडत नाहीत. आपल्याला आयुष्यात काय मिळाले याचा विचार न करता काय मिळाले नाही हे लक्षात घेतले जाते. कुरकुरा स्वभाव बनतो. यावेळी धारणा तपासून पाहायला हव्यात. कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा विवेकनिष्ठ दृष्टीकोन हवा. तरी बरे झाले असा विचार करावा, जास्तीतजास्त वाईट काय होईल असा विचार करून त्यासाठी तयार राहावे.

वर्तनातील बदलही महत्वाचा यासाठी:

  •  ‘ऑउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ करायला हवे.मीच सर्व करेन असे न विचार करता कामे वाटून द्यायला हवीत.सोय पाहायला हवी
  • स्वत:साठी वेळ द्यायला हवा.स्वत:च्या आत डोकावायला हवे.आपले सुख बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून न ठेवता. स्वत:ची सोबत आवडायला हवी.
  • जीवनाचा वाढलेला वेग ही समस्या झाली आहे. स्वत:चा वेग ठरवायला हवा.

भावनिक गुंतवणूक करायला हवी. यासाठी वाच्यता न करता इतरांना छोट्यामोठ्या गोष्टीत मदत करणे, इतरांचे कौतुक करणे,माफी मागणे, माफ करणे, कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी गोष्टी येतील. शारीरिक मर्यादा आल्या की ही गुंतवणूक उपयोगी पडते. मदत मागताना आपण कचरणार नाही.

शारीरिक आजाराबरोबर त्यातून मानसिक आजारही येतात. वेळच्यावेळी मानसोपचार तज्ञाकडेही जायला हवे. स्वमदतगट हा  सुद्धा मानसोपाचारच आहे. यानंतर अपंगत्वावर मात करून एव्हरेस्ट चढणाऱ्या अरुणीमाची गोष्ट् त्यांनी संगितली. आपल्यात दुर्दम्य इच्छाशक्ती असते तिचा वापर करा ‘डोन्ट गिव्ह अप’ असा संदेश दिला. अनुराधा करकरे यांचे व्याख्यान हेही शुभंकर शुभार्थीसाठी सकारात्मकतेकडे नेणारा मानसोपचार ठरला.

यानंतर तळेगावच्या एमआयटी फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या शिलोत्री हिने आपल्या प्रकल्पाविषयी माहिती सांगितली. शुभार्थिनी सहभागी व्हावे अशी विनंती केली.

संस्थेच्या अध्यक्ष श्यामला शेंडे या अमेरिकेत असल्या तरी त्यांचा फोन ,WhatsApp, मेलद्वारे, सहभाग, संपर्क असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यामार्फत चहा देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क