Saturday, May 18, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्स विषयक गप्पा - ५७ - शोभनाताई

पार्किन्सन्स विषयक गप्पा – ५७ – शोभनाताई

मागच्या गप्पात उमेश सलगर यांच्यावर स्वतंत्र लिहायला हवे असे म्हटलं, कारण लॉकडाउनच्या काळात त्यांनी नवनवीन बऱ्याच गोष्टी केल्या.गाण्यांवरील कार्यक्रम हा त्यातील एक.
ते आमच्या घरी तिनदा येऊन गेले होते, सहल सभा यामध्ये त्यांच्या भेटी होत गेल्या. फोनवरही खुपदा बोलणे होई. त्यांच्यावर मी अनेकदा लिहिलेही. तरी त्यांची गाण्याची passion माझ्या लक्षात आली नव्हती. व्हाट्सअप वर त्यांनी एकदा एका गाण्यावर टिपणी केली. व्हॉइस मेसेज मधून ते भरभरून त्याच्यावर बोलले आणि त्यावरून अतुल ठाकूर यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या प्रोत्साहनातून जुन्या हिंदी गाण्यावरील तीन कार्यक्रम त्यांनी सादर केले.-याला कोरोनाची कृपा असे ते म्हणतात.- ‘वो भुली दास्ता’ हा
गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या गाण्यावरील कार्यक्रम
‘वसंतोत्सव’ हा प्रेम आणि प्रेम गीतावरील गाण्याचा कार्यक्रम आणि तिसरा’ रात्र सुरांची तुमची आणि आमची’ हा रात्रीवरील गाण्याचा कार्यक्रम.
प्रत्येक कार्यक्रम त्यांनी आठ दिवस सादर केला.
हातांना कंप असल्याने त्यांना लिहून काढणे शक्‍य नव्हते. त्यांनी आठवणी वर आधारित थेट बोलूनच निवेदन केले. ते सांगत होते, सुधीर गाडगीळ यांनी एकदा निवेदकांसाठी कार्यशाळा घेतली होती आणि त्यावेळी सांगितले होते की हातात कागद घेऊन सादरीकरण करण्यापेक्षा तो नसताना उत्स्फूर्तपणे करणे जास्त चांगले.ते जास्त प्रभावी होते. पार्किन्सन मुळे त्यांचे म्हणणे आपोआपच प्रत्यक्षात आले. पार्किन्सन्सचे यासाठी आभारच मानायला हवेत.
याशिवाय विविध पदार्थांच्या रेसीपी त्यांना द्यायच्या होत्या.या काळात
खाणे आणि त्याबद्दल बोलणे हे त्यांना मनसोक्त करता आले. खायला घालणे हे मात्र सोशल डिस्टंसिंग मुळे त्यांना करता आले नाही.
त्यांनी व्हाट्सअप वर विविध सरबते, सारांचे आणि चटणी चे विविध प्रकार, उन्हाळ्यातील पदार्थ, न्याहारीसाठी पदार्थ, विविध टिप्स हे सर्व अगदी बारकाव्यांसह व्हॉइस मेसेज,फोटो, व्हिडिओद्वारे, टाकले. त्यांच्या या सर्व कृतींचे शुभंकर,शुभार्थीं
यांच्याकडून भरभरून कौतुक झाले. शुभार्थी भुषणा भीसे यांनी त्यांना बक्षीस म्हणून स्वतः तयार केलेले सुंदर पेंटिंग दिले आणि विचारले,
‘ Please do tell me your experience because you are so enthusiastic and positive that I am keen to know your experience.
मला केवळ कुतूहलापोटी आपल्याला विचारावेसे वाटते की आपल्याला off time / inactive time चा त्रास होतो का? असल्यास कशा प्रकारचा? कारण मला rigidity (ताठरपणाचा) खूप त्रास होतो आणि अगदी नको वाटते.’
यावर त्यांनी व्हॉइस मेसेज वर उत्तर दिले.
त्यांना काय त्रास होतो आणि ते त्यावर मात कशी करतात हे दोन्ही सांगितले त्यांना होणारा त्रास याद्वारे प्रथमच सर्वांच्या समोर येत होता. ते सदैव आनंदी दिसत त्यामुळे त्यांना काही त्रास असावा असे वाटलेच नव्हते.
खरंतर त्यांच्या आवाजातील ते व्हॉइस मेसेज टाकणं हे जास्त योग्य झाले असते पण मला ते इथे टाकता येत नसल्यामुळे त्यांच्या मेसेज चे शब्दांकन देत आहे यातील शब्द नी शब्द त्यांचा आहे.
ऑफिस आणि घर यात बऱ्याच गोष्टी करायच्या असूनही वेळ मिळत नव्हता. Lock down मुळे तो मिळाला. पीडीमध्ये शारीरिक तेवढेच मानसिक दौर्बल्य येते.या पिरीएड मध्ये मी निवांत होतो ऑफिसला जाण्याची घाई, सकाळी उठून आवराआवरी करायची घाई नाही यामुळे माझी गोळी ही कमी झाली. अर्थात डॉक्टरना विचारूनच केली. इतर वेळेला तारांबळ उडते सर्कशीतील जोकर अनेक टोप्या एकावेळी उडवून दाखवतो एका क्षणी एक टोपी पडते.मग सगळ्याच पडतात तसे आपले होते. एका वेळेला दहा तीर मारायला बघावे. शरीर साथ देत नाही. भाजीपाल्या सारखे निर्जीव आयुष्य होते. यात मनाची भक्कम अवस्था महत्त्वाची. मनाने कमकुवत दुबळे झाला की औषधाचा डोस वाढतो. मग कोणते औषध याची ट्रायल सुरू होते मग त्याचे पुन्हा परिणाम, असे दुष्टचक्र सुरू होते. आपल्याला कशामुळे त्रास होतो हे शोधून त्या गोष्टी टाळायला पाहणे. खूप दगदग, विचार, अविचार हे कशाने आलेला आहे हे शोधायचे चांगले जगायचे असा निर्धार करायचा. निर्भर व्हायचे. आपण विविध काळज्या करतो. मुलांची काळजी, म्हातारपणी कसे ही काळजी ते सोडून द्यायचे. आता करोनामुळे जीवन अनिश्चित झाले आहे. आपल्या हातात काहीच नाही त्याची काळजी का करायची? चिता आणि चिंता या दोन्ही जाळत असतात चिता गेल्यावर चिंता जिवंत असतानाच. आपली तब्येत चांगली ठेवणे आपल्या हातात आहे मनाने भक्कम रहा ही विनंती
मलाही ऑन ऑफचा त्रास होतो मी गोळ्या विसरतो, हात थरथरतो, भाकरी करताना उजवा हात काम करत नाही टाईप पण करता येत नाही. हात थडथड उडतो. पाच मिनिटे शांत राहतो आणि परत सुरु करतो. सहा तासानंतर गोळी चा इफेक्ट कमी होतो. हातातून पदार्थ खाली पडतात. जेवताना अंगावर सांडते. लग्नात वगैरे असे झाले की अपराध्यासारखे वाटते. चांगले कपडे घालायचे मी सोडूनच दिले आहे. पण या सर्वातून बाहेर यायलाच हवं असे मला तरी वाटते. जेव्हा एकटा असतो तेव्हा कशाला दाद देत नाही मला हवं ते करतो नवीन-नवीन पदार्थ करून खावेसे वाटतात ते खातो माझं खाण्यामुळे वजन बेसुमार वाढले मध्यंतरी डॉक्टर सांखला मेळाव्याला आल्या.त्यांना वजन वाढण्या बद्दल प्रश्न विचारला असता,यांचा अर्थ पार्किन्सन्स आटोक्यात आहे.वजन कमी झाले तर तो वाढला असे आम्ही म्हणतो. कलाकृतींमध्ये मी खांडवी च्या वड्या ठेवल्या होत्या त्या त्यांनी खाऊन पाहिल्या आणि म्हणाल्या असे चांगले करून खाता मग वजन वाढणारच. पीडी पेशंटचे वजन उतरत असते माझे मात्र वाढते. एका गोळीचा ही हा साईड इफेक्ट आहे. मला बीपी, डायबेटीस नाही. गोड आवडतं. मी मनसोक्त गोड पदार्थ करून खातो. खरं सांगू टेन्शन येतं तेव्हा मी खातो. मला ऑफिसचे टेन्शन येते. वैयक्तिक लाईफमध्ये एकाकी वाटते इथे मला व. पु. काळे यांची एक कथा आठवते. एका स्त्रीची सासू खूप का खा करायची. नवऱ्याला ती हे सांगत राहते जेव्हां मुलीच्या बाळंतपणासाठी ती विमान प्रवास करते त्यावेळी तिला खूप टेन्शन येते आणि एअर हास्टेस कडे ती पुन्हा पुन्हा काहीतरी मागून खात राहते आणि तिला सासू ची आठवण येते. मी जस्टीफाय करत नाही पण हे खरं आहे. जेवल्यानंतर मला रोज वडी, लाडू काहीतरी गोड लागते मी डब्यातही घेऊन जातो. हे सर्व लोकांनाही देतो. खाणे खायला करणे, खायला घालणे आवडते.
तुम्ही प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायला मला वेळ झाला कारण मला एवढे मोठे उत्तर उजव्या हाताने टाईप करता येत नव्हते म्हणून मी व्हॉइस मेसेज चा पर्याय निवडतो.मी टाईप मेसेज पाठवतो त्यात खुप चुका असतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल. माझा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला पण मन नाही झाले. मन मी घट्ट ठेवणार आहे. माझी बायको लवकर गेली. मला मुलाचे लग्न करायचे आहे. माझ्या मुलासाठी मला जगलेच पाहिजे. जगून राहिले पाहिजे तगुन राहिले पाहिजे. मुलाचे लग्न पहायचे आहे नातवंडे पाहायची आहेत. तुम्हीच माझे नातलग आहात माझ्या पाठीशी राहा. हे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला.
त्यांच्या अनुभवाच्या बोलावर मी काही भाष्य करावे असे मला वाटत नाही. त्यांच्या विविध कार्यक्रमांचा त्यांच्या आवाजात आम्ही मनमुराद आस्वाद घेतला तो तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवावा यासाठी डॉक्टर अतुल ठाकूर प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क