Saturday, May 4, 2024
HomeArticlesशीलाताई - केल्याने होता आहे रे ! - डॉ.शोभना तीर्थळी

शीलाताई – केल्याने होता आहे रे ! – डॉ.शोभना तीर्थळी

Photo0708

अनिल कुलकर्णी आणि शीलाताई कुलकर्णी म्हणजे मित्रमंडळाचे उत्साही कार्यकर्ते.सुरुवातीला त्यांच्या फॉर्महाउसवर मिटिंग व्हायच्या दोनदा सहल ही गेली होती. दोघानाही पार्किन्सन्स आहे.अनिल कुलकर्णी मध्यंतरी पडले शस्त्रक्रिया झाली त्यातून बरे होतात तोच न्युमोनिया आणि इतर काही आजारांना सामोरा जाव लागल.त्याना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.थोडे धास्तावलेल्या मनानेच.कारण रेवणकर भेटून आल्या तेंव्हा ते थोडे डीप्रेस होते.पण आम्ही गेलो तर परिस्थिती बदलली होती.नैराश्य डोकावून परतून गेल होत.आम्ही परत आलो ते सकारात्मक उर्जा घेऊन.

त्यांची मदतनीस( त्यांच्याकडे कामाला असलेले कोणी नोकर नसतात तर सर्व त्यांचे मदतनीस असतात ) अनिताने चकली,चिरोटे,लाडू करंजी असा फराळ आणून ठेवला.सगळा स्वयंपाकीणबाईकडून घरी करून घेतलेला होता..शिला ताईना आलेल्या लोकाना चांगल चुंगल खायला घालायची हौस आहे. त्यांचे मदतनीसही याबाबत तयार झालेले आहेत.शीलाताई आत होत्या आम्ही तेथे गेलो.” २९ दिवस झाले या खोलीतून दोघही बाहेर गेलो नाही” शीलाताई सांगत होत्या.अनिल कुलकर्णी शय्याग्रस्त होते. आम्हाला अगत्याने बसा म्हणाले.मित्रमंडळाच्या कामाची, सहकार्‍यांची चौकशी सुरु झाली.२/४ दिवसात पीसीवर बसण चालू करणार संचारसाठी काहीतरी लिहीन अस सांगत होते.टीव्हीवर ब्ल्यॅक अँड व्हाइट जमान्यातली मन प्रसन्न करणारी गाणी सुरु होती.आजाराविषयी बोलणी झाली.मोकळ्या वातावरणात गप्पा चालू होत्या.आम्ही तासभर होतो मधूनच ईंग्लंडहून आलेले मुलगा, सून, वरतीच राहणारी मुलगी येऊन गेली.कुलकर्णींची विनोदबुद्धी नेहमी शाबुत असते.’यांच प्रोफेशन ओळखल असशील’ सुनेला ते विचारात होते. माझ वरच्या पट्टीतल बोलण आणि देहबोली यातून सहजपणे जाणवणार्‍या शिक्षकीपणाबद्दल ते माझी मधुन मधून फिरकी घेत असतात.नंतर आम्हाला पुरणपोळीचा आग्रह करून झाला.बोलता बोलता शीलाताईनी स्वेटर विणण्याच काम चालू केल.अनिता सांगत होती माझ्यासाठी स्वेटर विणायला घातलाय.’अनिता सभाना नेहमी शिला ताईंच्या बरोबर असते त्यांच्याबरोबर तीही नृत्य शिकायची त्यामुळे आम्हा सर्वांच्या परिचयाची आहे .चित्रकला,पेटी शिकण चालू आहे ना? ‘ मी विचारलं. ‘सध्या काही दिवसासाठी बंद आहे.’शिला ताई म्हणाल्या.

तेवढ्यात अनितानी त्यांच्या चित्रकलेच्या वह्या आणल्या.कौतुकानी ती चित्र दाखवत होती.बरेच दिवस त्यांच्या चित्रकलेचे फोटो वेबसाईटवर टाकायला काढायचे होते.मोबाईलवर काही फोटो घेतले.व्यक्तीला याचे स्वेटर विणत असलेल्या शिलाताईंचाही फोटो घेतला.ड्रेसिंगसाठी नर्स आल्यावर आम्ही उठलो. या भेटीबद्दल इतक्या विस्ताराने सांगायचं कारण,पिडीमुळे वेळोवेळी नैराश्य येण्याचे प्रसंग येतात.पण त्याना धीरांनी तोंड देऊन बाहेर पडण्याचे विविध मार्ग शोधून आनंदी राहण्याची धडपड करता येते हे आपल्यासमोर मांडण.शिलाताईनी काढलेल्या चित्रांचे फोटो सोबत दिले आहेत त्याबरोबर ११ एप्रिल २०१०च्या स्मरणिकेत आलेला लख आणि त्या स्मरणिकेचे शिला ताईच्या चित्राने नटलेले मुखपृष्ठ

Top
“Moving water cannot be frozen such as moving muscles cannot be restricted so keep your muscles always moving to keep yourselves here and there like an average person”

पार्किन्सन्स रूग्णासाठी मोलाचा असा हा संदेश.पार्किन्सन्समुले हातापायांच्या स्नायुने बंड पुकारले असता त्याला तितक्याच ताकदीनी शह देऊन आनंदी जीवन जगण्यासाठी धडपड करणारे अनेक शुभार्थी आढळतात. पार्किन्सन्समित्रमंडळाच्या उत्साही कार्यकर्त्या डॉक्टर सौ शिला ताई कुलकर्णी त्यातील एक.कलेच्या माध्यमातून त्यांनी प्रतिकूलता अनुकूलतेत बदलली.

[Best_Wordpress_Gallery id=”4″ gal_title=”शीलाताई”]

डॉक्टर शीलाताईनी ३०/३५ वर्षांच्यावर भारत व भारताबाहेर वैद्यकीय व्यवसाय केला.अनेक रुग्णांवर उपचार केले.दिलासा दिला.पण त्यांचे पती अनिल कुलकर्णी आणि त्या स्वत: या दोघानाही पीडी झाल्यावर मात्र नैराश्यांनी घेरले.पण त्यात गुंतून न राहता त्यातून बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले.ताठरणार्‍या बोटाना वठणीवर आणण्यासाठी कॅरम,विणकाम, चित्रकला यांचा आधार घेतला.जवळच राहणार्‍या सोनाली राणेकडून चित्रकलेचे धडे गिरवण्यास जून २००९ मध्ये सुरुवात केली.आठवड्यातून ५ दिवस रोज एक तास शिकणे चालू झाले.शीलाताई म्हणतात यापूर्वी शालेय जीवनात एक अनिवार्य विषय म्हणून आणि वैद्यकीय शिक्षणात आकृत्या काढण्यापुरता चित्रकलेशी संबंध होता.आता अडुसष्टाव्या वर्षी पेन्सिल हातात धरली.आडव्या, उभ्या,तिरप्या रेषा काढण्यापासून सुरुवात केली. शिक्षक आलेल्यावेळी ऑफ तैम असला तर उठून बसताही यायचे नाही. सुरुवातीला हात दमायचे.सारखे खोडरबर लागायचे.रेषांच्या फटकार्‍यातून बोटांची असमर्थता जाणवायची.पण मनाचा निर्धार सतत सराव यांनी रेषा स्थिर होऊ लागल्या.त्रीमितीची नजर आली,प्रमाणबद्धता जमू लागली.एकाच पेन्सिलीने कमी जास्त दाब देत शेडींग करणे जमू लागले.निसर्गचित्र,वस्तुचित्र,व्यक्तिचित्रसगळ सरैतासारख जमू लागल

एका वर्षातील ही प्रगती ‘असाध्य ते साध्य करीता सायास’ याची प्रचीती आणणारी.विशेष म्हणजे सलगचित्रकलेसाठी एक तास बसूनही शरीर कुरबुर करेनासे झाले.औषधाची आठवण होईना.शिलाताईंच्या चेहर्‍यावरचे नैराश्याचे भावही लुप्त झाले.उत्साह आत्मविश्वास वाढला.त्यांची शिक्षिका सोनाली राणे म्हणते,’चित्रकलेत त्यांनी प्रगती केलीच पण चित्रकला शिकताना आणि चित्रे काढताना त्यांच्या शारीरिक,मानसिक अवस्थेत झालेले स्थित्यंतर अधिक आनंददायी आहे’ पार्किन्सन्सच्या प्रत्येक पेशंटनी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारून आपल्याला आनंद देणारी कला, हालचाली शोधून त्याचा सातत्याने वापर केल्यास आनंददायी जीवन जगणे नक्कीच शक्य आहे.हाच या मुखपृष्ठ कथेचा संदेश.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क